Friday 20 December 2019

प्रचितगड किल्ला ट्रेक वर्णन : अमित गुरव

एक रपेट कोकणची 

रौद्रभीषण सह्याद्रीतील प्रचितगड,  डेरवन शिव समर्थगड, पांडवकालीन कर्णेश्वर मंदिर,  सप्तेष्वर मंदिर आणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल, निसर्गाने नटलेल अस श्रुंगारपूर गाव अन सोबत  कोकण ची साधी भोळी माणसं.......

या सगळ्यांचा एक अप्रतीम अविस्मरणीय संगम रत्नागिरी मधील संगमेश्वर तालुक्यात आम्ही अनुभवला.....

दिनांक १३.१२.२०१९ पार्ले ट्रेकर्स चे आमचे १५ मावळे सज्ज झाले  विले पार्ले येथील हनुमंत मंदिराच्या इथे अजून एक थरारक मोहिमेसाठी रौद्रभीषण असा किल्ला प्रचितगड  आमच्या गृप चे कार्याध्यक्ष श्री दीपक बामूगडे यांनी हनुमंत मंदिरात  नारळ अर्पण केला आणी सगळे नतमस्तक झाले मारुतीचरणी, अन  १५ धुळीकण उधळले तळकोकण सर करण्यासाठी काही अडचणी असल्या कारणान प्रखर ईछा असूनही दीपक येऊ शकला नाही सगळ्यांना कडक शब्दात सूचना देऊन दीपक ने सगळ्याचा निरोप घेतला आणी आमची गाडी निघाली विले पार्ले मधून. नेहमी प्रमाणे माझी वसुली सुरू झाली होती.पुढे आम्हाला अमोल व अजून २ मावळे सतीश आणी सदा  येऊन मिळाले...सगळेच वाट पहात होते सदा ची कारण ही तसच सगळ्यांच्या आग्रहाखातर बिर्याणी आणली होती त्याने...अजूनपर्यन्त आमचे बुवा राजेंद्र यांच्या भजनांला सुरवात झाली होतीच साथ अमोल ची होतीच सगळेच भजनांत चांगलेच रंगले होते साधरण १.३० च्या आसपास आम्ही पनवेल पार केल पुढे एक धाब्यावर सगळ्यानी बिर्याणीवर ताव मारला आणी परत नियोजीत मोहीम सुरू झाली  रायगड जिल्हा चालू झाला  तशी थंडीची चाहूल सगळ्यांना लागू लागली पेटपूजा झाली तशी सगळेच झोपी गेले. 
साधारण सहा च्या आसपास गडाच्या पायथ्याचे गाव गाठण्याचा आमचा बेत होता पन सरकारच्या क्रूपे मुळे आम्हाला उशीर हा झालाच. जागो जागी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे  काम चालू आहे.असो भविष्यातील विचार करून आम्ही स्वताला आवर घातला. साधारण आठ  च्या आसपास आम्ही चिपळूण सोडले दुर्गभ्रमंती चा विचार केला असता आम्हांला पायथ्याचे गाव गाठण्यासाठी खूपच उशीर झाला होता कारण येथून गडाच्या पायथ्याचे गाव श्रुंगारपूर साधरण साठ किलोमिटर चे अंतर आणी गावच्या रोड ची अवस्था बघता अजून दोन ते तीन तास  तरी लागलेच असते  मग आमच्यातील मोठय़ांनी निर्णय घेतला ट्रेक उद्या करूया आणी दुसऱ्या दिवशीचा बेत पहिला करूया कारण गड चढून उतरायला साधारण आठ ते नऊ तास लागतात तेही जे नियमित ट्रेकिंग करतात त्याना.  आणि आम्हांला चढून उतरण्यासाठी साधरण रात्रीचे आठ नऊ वाजले असते. नवीन ट्रेकेर्स ला ध्यानात ठेऊन व सुरक्षेचा विचार करून आम्ही ट्रेकिंग उद्या करण्याची ठरवली.
व आम्ही सगळ्यात पहिल डेरवन शिवसृष्टी पाहण्याचा निर्णय घेतला.
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे गावाजवळ सुमारे २ कि.मी. अंतरावर डेरवणची देखणी ‘शिवसृष्टी’ उभी आहे. साडे आठ च्या सुमारास आम्ही येथे पोहचलो सगळे थोडे फ्रेश झाले आणि ताजेतवाने होऊन प्रथम शिवरायांचे दर्शनास आम्ही निघालो.येथे  उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ गडाच्या तटबंदीसदृश भिंतींमधे छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगशिल्पे कोरण्यात आली आहेत. सुंदर शिल्पांच्या माध्यमातून साकारलेले विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेकाचं शिल्प फारच अप्रतिम आहे. शिवसृष्टीच्या जवळ असलेला समाधी मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य व शांत आहे. सकाळी ८ ते सायं.६ या वेळेत पर्यटक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात.
सीतारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भव्य शिवसृष्टी उभारली गेली आहे. कोकणाची पर्यटनयात्रा करताना चिपळूण तालुक्यातील `डेरवण शिवसृष्टी` हे एक बघण्यासारखे ठिकाण आहे पूर्ण शिवसृष्टी पाहून झाल्यावर आमची पुढची वाटचाल सुरू झाली. पुढच्या टप्प्यात कर्णेश्वर आणि सप्तेष्वर  मंदिर करण्याच ठरल. आणि पुढची वाटचाल चालू झाली आमची.
संगमेश्वर रेलवे स्टेशन च्या  जवळचे गाव धामणी येथे पोहचलो असता बाजूने च एक नदी वाहत जाते सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे अस म्हणतांत की नदीच्या काठावर संस्कृती तयार होते. त्यामुळे लोकांचे दैनदिन व्यवहार हे नदीच्या संपर्कानेच अधिक होतात. त्यामुळे धर्माचरण म्हणजे दैनंदिन अंघोळ, संध्या, जप, तर्पण यासारख्या गोष्टी प्राचीन कालापासून नदीच्या किनारीच होऊ लागल्या. त्यामुळे नदी हे त्या त्या गावाचे प्रमुख सामाजिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते. नदी मधे पोहण्याचा मोह आम्हांला आवरला नाही 
आमच्या तील महेश चे ते गाव होत त्यामुळे त्यानी आम्हांला योग्य ठिकाणी पोहायला नेल मग काय  कोणताही विचार न करता सगळे मावळ्यांनी मनसोक्त आंनद घेतला गावच्या नदीत पोहण्याचा. नंतर सगळ्यांना सपाटुण भूक लागली होती मग काय मावळ्यांनी लगेचच  कांदा आणी टोमाटो कापून झटपट आणलेली भेळ बनवली आणी मनसोक्त नदीकाठच्या निसर्गात चटपटीत भेळ खाण्याचा आनंद लुटला. कर्णेश्वर मंदीरात जाण्याआधी सगळे ताजेतवाने झाले होते झटपट आटपून आमची पुढची वाटचाल चालू झाली पुढच्या अर्ध्या तासातच आम्ही कसबा या गावात पोहचलो संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात.  या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांचा क्रूर हत्या केली. या घटनेमुळे संगमेश्वरचे नाव दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी म्हणून इतिहासात नोंदविले गेले आहे. हा कटू परंतु सत्य इतिहास आहे. कसबा-संगमेश्वर येथील नागरिकांना या दुर्दैवी घटनेची खंत आणि वैषम्य वाटते. परंतु तो इतिहास आहे. 

छत्रपतीं संभाजी महाराजांस जिथे पकडले तिथ आता एक स्मारक आहे त्याचे डागडुजी चे काम सध्या चालू आहे छत्रपति संभाजी महाराजां पुढे नतमस्तक होताच सगळ्याच उर अभिमानाने भरून आला पाण्याने भरलेले डोळे घेऊन आम्ही पुढे निघालो..पुढेच पाच मिनिट च्या अंतरावर  कर्णेश्वर मंदिर आहे      कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर.
संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर 'कर्णेश्वर' नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत.

मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.

मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते.

अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते. मंदिरामध्ये आम्ही आणलेला नारळ अर्पण करून महादेवाचे दर्शन घेऊन जयघोष केला. आणी आम्ही महादेवाच् दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. एव्हाना दुपारचे बारा वाजले होते सगळ्यांना भूक लागली होती पण अमोल अविनाश आणी मी सप्तेष्वर मंदिर करून मग च विश्राम करू असा आग्रह केल्यामुळे ग्रुप च्या अध्यक्षांनी आमुचा मान ठेवला आणी गाडी सप्तेष्वर च्या वाटेवर निघाली. हा रस्ता ही थोडा खडतर आणी वळणावळणा चा आहे.
सप्तेष्वर महादेवाच अजून एक सुंदर अस देवस्थान घनदाट जंगल आणी निसर्ग सौंदर्य लाभलेल हे देवस्थान. मंदिराच्या बाजुलाच सात पाण्याचे कुंड आहेत या सात कुंडाच पाणी एका ठिकाणी मिळून गोमुखातून नंतर तलावात  जाते आणी पुढे एक छोटा ओढा बनतो या सात कुंडा मुळे या मंदिराचे नाव सप्तेष्वर अस पडल. तलावांमधे खूप मासे आहेत आम्ही थोडा वेळ तलावाच्या बाजूने बसलो फ्रेश झालो मग महादेवाचे दर्शन घेतले महादेवाच्या पिंडी चा बाराही महिने निसर्ग निर्मित पाण्याने अभिषेक होत असतो दर्शन घेऊन मग सगळ्यानी आपल आपल गाठोडं उघडल आणी गडावर खायला आणलेला कांदा न भाकरी ची न्हायीरी सगळ्याची मंदीरातच झाली. एव्हाना संध्याकाळ चे चार वाजले होते दुसऱ्या दिवशी चा बेत पहिल्या दिवशीच आमचा पूर्ण झाला  होता आता सगळ्यांना थकवा जाणवू लागला होता रात्रभर प्रवास करून दिवसभर फिरून झाल्यावर वेध लागले ते आम्ही जिथे राहणार होतो तिथे जाण्याचे म्हणजे महेश च गाव आंबेड भरभर संगमेश्वर बाजारपेठेत रात्रीच्या जेवणाच सामान घेतल आणी निघालो मुक्कामी. जाण्याचा रस्ताही खडतर च होता सापाच्या वळणासारखा रस्ता चढत आम्ही महेश च्या गावी पोचलोदेखील 
एव्हाना साधारण साडे सहा वाजले होते थोड फ्रेश होऊन गरमागरम चहा झाला आणी तयारी चालू झाली रात्रीच्या जेवणाची महेश नी नेहमी प्रमाने एकदम भारी चिकन बनवल होतआणि  त्यांच्यासोबत भाकरी  मग काय पंगती मधे बसून  जेवणावर तावच मारला ना राव सगळ्यानी. कोकण च्या जेवणाची चव वेगळीच. ती शब्दात वर्णन नाही करता येनार.
मग गप्पांचा फड रंगला. प्रत्येकाचे अनुभव, कथा, विनोद असं सगळं.. झोपायची तयारी सुरू झाली. सगळ्यांची झोपायची जागा निश्चित झाली. अध्यक्षानी सूचना केल्या उद्या सकाळी चार वाजता उठायचे  आहे त्यमुळे सगळ्यानी लवकर झोपा, थकल्या करणाने सगळे लवकर झोपी गेले.आम्ही काही जण निसर्गाचा मनमुराद आनंद घेत होतो अंगणात गप्पा गोष्टी करत गप्पा मारता मारता केव्हा रात्रीचे बारा वाजले कळलंच नाही.सकाळी लवकर उठायच आहे म्हाणूण आम्ही पन नंतर झोपी गेलो. 
रात्री लवकर झोपल्यानं सगळे लवकर सकाळी
साडे चार वाजेपर्यत उठले सगळ्यांच आटपे पर्यन्त साडे पाच वाजले होते. पहाटेस फक्कड चहा आणी सोबत आणलेली बिस्किट खाऊन आम्ही  महेश च्या घरच्यांना निरोप देऊन धन्यवाद मानून निघालो. आमच्या पंढरी कडे प्रचित गडाकडे शास्त्री पुलाच्या इथे आम्हांला आमचे अजून दोन मावळे भेटले मग चालू झाली वाटचाल श्रुंगारपूर ची  कसबा सोडल्यानंतर रस्ता हा घनदाट जंगलातून चालू होतो , काही गावांमधून असा पुढे जाताना आजूबाजूची दृश्यं मन मोहून टाकतात. काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कृपेनं रस्ता थोडा खराब आहे.पन अप्रतीम निसर्ग सौंदर्य या  गावांना लाभल आहे. साधारण साडे सात पर्यन्त आम्ही गडाच्या पायथ्याचे गाव श्रुंगारपूरात पोहचलो गावातून उत्तर दक्षिण पसरलेला प्रचितगड दिसतो. ट्रेकींग नवीन नव्हते किंवा धबधबेही बरेच पाहिले होते, पण अत्यंत दुर्गम असलेले आणि कधी जाउ शकु कि नाही, मनात धडकी भरवणार असे ते सह्य़ाद्री च रूप  पहाताच रोमांच आले.  आजच्या दिवसात चांगलीच वाट लागणार याची मला खरी प्रचिती आली. प्रचितगडावर झालेल्या अपघातांमुळे गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीत एक नोंद वही ठेवलेली आहे. त्यात नोंद करुन जाणे आवश्यक आहे. आम्ही नोंद केली आणी तेथील एक वाटाड्या घेऊन आम्ही गडभ्रमंती सुरू केली 
पुढे गावातून वाहाणार्‍या ओढ्याच्या बाजूने आम्ही निघालो सिमेंटच्या रस्त्याने गावातली वस्ती संपेपर्यंत चालत गेल्यावर पायवाट लागते. या पायवाटेने अर्धा तास दाट जंगलातून चालल्या नंतर ओढा आडवा येतो. इथे सगळ्यानी पाणी भरून घेतले कारण मधे कुठेही पाणी नाही गडमाथा गाठे पर्यन्त. ओढा ओलांडून पलिकडे गेल्यावर गावाच्या आणि किल्ल्याच्या मधे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. डोंगराची दाट झाडीतली खडी चढण चढुन पठारावर पोहोचायला १ तास लागला.तिथे थोडी विश्रांती  केली  आव्हाना आमच्यातील पाच मावळे परत माघारी फिरले होते अतिशय थकवनारी अशी ही वाट आहे',  प्रचंड दमणे म्हणजे काय याचा अनुभव आला. "बास झाले ट्रेकिंग" असाही विचार मनात आला (सुदैवाने फार काळ टिकला नाही).  पण बाकीच्यांनी निर्धार सोडला नाही.. पठारा वरुन १० मिनिटे चालल्यावर पुन्हा खडा चढ लागला. साधारणपणे पाउण तासात आम्ही  सुकलेल्या धबधब्या जवळ आलो. इथे एका गिर्‍यारोहकाची स्मृती शिळा बसवलेली आहे. पुढच्या टप्प्यात ठिकठिकाणी ८ शिड्या बसवलेल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या शिड्यांवरुन चढताना छोटे छोटे दगड निसटुन खाली येतात त्यामुळे सांभाळून चढावे लागते.अजुन खरा थरार बाकी होता. वाट घसरड्या मुरुमाने भरली होती. साधारण वीस फुटाची हि चढण कारवीच्या वाळलेल्या झाडांचा आधार घेऊन अक्षरशः गुढगे आणि कोपर घासत कसाबसा चढलो. हात सटकला असता तर माझ्या हातून हे लिहीले जाण्याचीही शक्यता नव्हती. शिड्यांचा टप्पा पार केल्यावर आम्ही  गडाच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचलेलो असतो. येथून गडाच्या दक्षिण टोका खालुन उत्तर टोकाकडील दरवाजा खालील शिडी पर्यंत आडवी चढत जाणारी वाट पार करायला १ तास लागतो. या वाटेवर खूप घसारा (स्क्री) असल्याने खूप जपून चढाव आणि उतराव लागते.
हि घसार्‍याची वाट संपल्यावर आपण उत्तराभिमुख दरवाजा खालील शिडी पाशी पोहोचतो. या मोठ्या शिडीच्या पायऱ्या आणि कठडा तुटलेला आहे त्यामुळे जपून शिडी चढावी लागते. चढल्यावर आपण उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारा समोर पोहचलो सध्याची अवस्था एकदम बिकट आहे  . प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक बुरूज आहे. किल्ला चढतांना हा बुरुज आपल्याला खालूनही दिसतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या बाजूने वर चढून टाक्याला वळसा घातल्यावर आपण प्रवेशव्दाराच्या पुढे असलेल्या डोंगराच्या नाकाडावर पोहोचतो. किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर आणि बाजुचा डोंगर यामधे खिंड तयार झालेली आहे. या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवेशद्वारावर येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी येथे बुरुजाची योजना केलेली आहे.
टाक पाहून परत पायवाटेवर येउन छोटासा चढ चढुन दक्षिणेस चालत गेल्यावर आम्ही  पत्र्‍याच्या शेड मध्ये बांधलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी आलो. देवळाच्या परिसरात ५ तोफा ठेवलेल्या आहेत. देवळात तीन मूर्ती आहेत. स्वयंभू अशी मधली मुर्ती भैरी भवानीची असून बाजूच्या दोन्ही मूर्ती भैरोबाच्या आहेत. प्रचितगडावरील भैरी  भवानी पंचक्रोशीतील लोकांची कुलदेवता आहे व अतिशय कडक व जून देवस्थान आहे.मंदिर पाहून पुढे गेल्यावर कारवीच्या झाडीत लपलेले घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथऱ्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेल खांब टाक पाहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक २ खांबावर तोललेल असून टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत . याठिकाणी एकूण पाण्याची ५ टाक असुन त्यापैकी ३ टाक पायऱ्यांच्या उजव्या बाजूला व २ टाक डाव्या बाजूला आहेत. या टाक्याचे निळसर पाणी सकाळच्या उन्हात चमकत होते. इथे थोडी विश्रांती केली गडावरील पाण्याची अवीट गोडी..... शब्द च नाहीत यासाठी  टाक पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या बाजूला ) तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पाहायला मिळातात. या भागात गडमाथा बऱ्यापैकी रुंद असुन गडावरील एकमेव मोठे उंबराचे झाड आहे. तिथून समोर दिसणाऱ्या उंचवट्यावरील वाड्याच्या दिशेने गेलो . वाड्याचे छप्पर पडलेले आहे. भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेतं . वाडा उजवी कडे ठेवत वाड्याला वळसा घालून मागे जाताना तटबंदी आणि फांजीचे अवशेष पाहायला मिळतात. वाड्या मागील उतार उतरुन समोर दिसणाऱ्या उंचवट्यावर चढून गेल्यावर आपण किल्ल्याचा दक्षिण टोकावर पोहोचतो. येथे पश्चिमेला (शृंगारपूरच्या दिशेला) कातळात खोदलेला एक खड्डा आहे . त्यात टेहळ्यांना बसण्यासाठी दोन स्टुला सारखे दोन उंचवटेही कोरलेले आहेत. टेहळ्या उन , गडावरचा भन्नाट वारा यापासून संरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारचा खड्डा खोदला असावा.किल्ल्याच्या दक्षिण टोका वरुन बाजूचा वानर टोक डोंगर आणि त्यावरचे छोटे सुळके सुंदर दिसतात. हे पाहून आम्ही  त्या उंबराच्या सावलीत थोडा वेळ विसावा घेतला थोडा सुका खाऊ व नाश्ता केला आणी आल्या वाटेने परत निघालो जाताना मंदीरात दिवा बत्ती केली आई भैरी भवानी ला साकडं घातल या तुझ्या लेकरना जस इथपर्यंत सुखरूप  आणलं आहेस तसाच त्यांचा पुढचा प्रवास सूखूरूप होउदें आणी सुख शांती लाभूदे जयघोष करत  श्रीफळ अर्पण केल आणी तो नारळ उभाच फुटला अस म्हणतांत कोणत्याही देवाला दिलेला नारळ उभा फुटला तर देव तुमच्या वर प्रसन्न असतो  आमच्या सोबत ही तेच घडलं व  सगळे  एकदम प्रसन्न झाले असाच आई भैरी भवानी चा आशीर्वाद घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला इथून पुढे  प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.
सावकाश सीडी उतरत आम्ही हळूहळू गावा च्या दिशेने उतरू लागलो या वाटेवर खूप घसारा (स्क्री) असल्याने खूप जपून उतराव लागते. तरी घसरड्या वाटेने उतरताना तारांबळ उडत होती. एकाबाजुला दिसणारी दरी आणि पायाखालुल बॉल बेरिंग पळावे तसे खडे घसरत होते. एरवी कोणताही गड पटकन उतरुन होतो, इथे मात्र उतरायलाच फार वेळ लागत होता पूर्ण वाट ही  घसार्‍याची आहे त्यमुळे सांभाळून कारण गड चढण्या पेक्षा उतरणं इथे कठिन आहे अन अंत  भला तो सब भला या प्रमाने काटेकोर पने नियम पाळत आम्ही हळूहळू उतरू लागलो साधरण चार  तास चालल्या नंतर आम्ही गडाच्या पायथ्याला  पोहचलो..बाजूने जाणाऱ्या ओढ्याला बर्यापैकी  वाहते पाणी असल्याने आम्ही तिथे आंघोळ करण्याचं निर्णय घेतला सगळ्यानी आपापल्या सामान खांद्या वरून उतरवल व  नदीत मनसोक्त आंघोळ केली..थोड बर वाटल सगळे फ्रेश झाले तिथून पुढे पाच मिनटात आम्ही गावात पोहचलो...अर्धवटच ट्रेकिंग केलेल्या आमच्या मावळ्यांनी खाली लाकडे पेटवून चुल केली होती आणि मॅगी तयार करत होते सगळ्यांना जाम भूक लागली होती त्यमुळे दोन मिनटात तयार झालेली मॅगी  डोळ्यात जाणार्‍या धुराकडे न लक्ष देता सगळ्यानी दोन मिनिटात च संपवली. सगळ झाल्यानंतर वाटाडया चे आभार मानून गावातील मंदिरा चे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा मुंबई चा प्रवास सुरू केला.

सूचना  - पहिल्यांदाच करत असाल हा ट्रेक तर वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे कारण   गडबडीत कोणी चुकले तर ह्या वनसागरात सापडणे कठीण...
गडावर अतिशय कडक व जून देवस्थान आहे त्यामुळे गावकऱ्यांनी दिलेले नियम काटेकोर पणे पाळणे.प्रचित गडावर याची प्रचिती आम्ही अनुभवली आहे...

सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे . किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट , अडचणीच्या जागी लावलेल्या डगमगणार्‍या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात.

शेवटचे दोन शब्द....' ' कशाला करता जिवाचा एवढा आटापिटा म्हणणाऱ्या साठी' ' ..! ! 

या मातीशी अमुचे नाते
दर्‍या कड्यांची ओढ सांगे
निसर्गा संगतीच आम्हा
स्वर्ग-सुखाची चाहूल लागे..! ! 

हरपून भूक तहान
विसरुन देहभान
गाठणे गडमाथा
हाच अमुचा सन्मान..! ! 

केवळ भटकणे अन् फिरणे
जरी असे हाच छंद
धडपडूनही न थांबणे
यातच अमुचा आनंद..! ! 

सह्याद्रीभ्रमंतीच्या ह्या क्षणांची
करितो मनी साठवण
तरिही क्षुधा शांत न होई
फिरूनी येई आठवण..! ! 

महाराष्ट्राचा इतिहास सांगत
सह्याद्री असे उभा खडा
त्याला भेटून येताना मात्र
ओलाविती अमुच्या नेत्र कडा..! ! 

शिवछत्रपती दैवत अमुचे
आम्हीच त्यांचे मावळे खरे
शिव-शंभूचे पराक्रम सांगत
साद देती सह्यशिखरे..! ! 

! ! याच्यासाठी केला होता अट्टाहास! ! 

लेख - अमित गुरव.....

No comments:

Post a Comment