Wednesday 30 March 2022

गटारी अमावस्या - कोकण गावाकडची रात्रीची पार्टी | Gatari Amavasya - Night Chicken Party | Konkan Vlog

 


दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या #गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही. हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात. आज आम्ही पण आमच्या गावी थोडीशी पार्टी करतोय. या तुम्ही पण आमच्यात सामील व्हा #Gatari #Gatariamavasya Gatari Amavasya | Gatari Amavasya Party | Gatari Amavasya

No comments:

Post a Comment