Wednesday 30 March 2022

गटारी अमावस्या - कोकण गावाकडची रात्रीची पार्टी | Gatari Amavasya - Night Chicken Party | Konkan Vlog

 


दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या #गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही. हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात. आज आम्ही पण आमच्या गावी थोडीशी पार्टी करतोय. या तुम्ही पण आमच्यात सामील व्हा #Gatari #Gatariamavasya Gatari Amavasya | Gatari Amavasya Party | Gatari Amavasya

रात्रीचे खेकडे पकडण्याची मज्जा | कोकणातील ओढ्यातले खेकडे । Sweet Water Crabs | Night Crab Catching

 मंडळी पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. नदि ओढे वाहु लागले. विहीरी पाण्यांनी भरल्या आहेत.आज आपण या व्हीडीओ मध्ये पाहणार आहोत ते ओढ्यातील म्हणजे गोड्या पाण्याच्या ओहळातील खेकडे कसे पकडले जातात. रात्रीचे खेकडे पकडण्यात खूप मज्जा येते. काळाकुट्ट अंधार, आमच्या सोबत असलेल्या बॅटऱ्या आणि रातकिडे सोबतीला असतात. आज आम्ही आमच्या इथे असणाऱ्या पर्यावर म्हणजेच ओढ्यावर चाललो आहे. चला मंडळी माझ्यासोबत खेकडे पकडायला म्हणजेच गावचे कुरळे / कितव्या पकडायला.

#CrabCatching #CrabHunting #KonkanCrabs #KokankarAvinash रात्रीचे खेकडे पकडण्याची मज्जा | कोकणातील ओढ्यातले खेकडे । Sweet Water Crabs | Night Crab Catching | Night Crab Hunting | Konkan Crab Catching | Konkan Crab Hunting | How to Ctach Crabs in Konkan | Konkan Khekde | Konkan Kurle | Konkan Kirvya

या वर्षीचा पहिला पिक्का फणस - स्वरांशाचा पहिला वाढदिवस | JackFruits Season | Kokankar Avinash


संध्याकाळची वेळ होती, ऑफिस ची कामे चालू असताना मुलांचा फोन आला. या वर्षीचा पहिला पिक्का फणस मिळाला होता मग काय सर्वानी मिळून खायला मज्जा येणारच. रामादाच्या दुकानाशी मुलांनी फणस आणला. सर्वानी या वर्षीचा पहिला फणस खायची मज्जा घेतली. संध्याकाळी क्रिकेट खेळलो आणि नंतर संदेशाच्या मुलग्यांच्या वाढदिवसाला गेलो. आज स्वरांश एक वर्षाचा झाला, पहिला वाढदिवस छान साजरी झाला. #JackFruits #FirstBirthDay #KokanVillage #KokankarAvinash व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा

Kokankar Aviansh Youtube Video : https://youtube.com/kokankaravinash

 

Monday 26 October 2020

Thursday 22 October 2020

मार्केट छोटे तरी एकदम ताजे मासे मिळतात - मनोरी फिश मार्केट, मालाड | Manori Fish Market, Malad


आज आपण आलो आहोत मुंबईतील मालाड मधील एक लोकप्रिय फिश मार्केट मध्ये. मनोरी फिश मार्केट असे या फिश मार्केट चा नाव. साहजिकच मनोरी गावच्या नावावरूनच याला हे नाव असावं. तसे हा मासळी बाजार छोटा आहे पण येथे मासे खूप ताजे असतात मनोरी फिश मार्केट येथे ताजे आणि स्वस्त मासे खरेदी करता येतात. हा मासळी बाजार मालाड मधील मनोरी गावात इथे मनोरी आणि गोराई येथून मासे विक्रीसाठी येत असतात. मासे खूप ताजे असतात. पापलेट, सुरमई, बांगडा, रावस, हलवा, बोंबील, वाम, खेकडे, कोलंबी असे नानाप्रकारचे मासे खरेदी करता येतात. Surmai, pompret, prawns, crabs, हे या बाजारात खूप लोकप्रिय आहे. मालाड स्टेशन पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे मार्केट आहे. तसे मार्केट छोटे दिसले तरी मच्छी खूप ताजी आणि स्वस्त असते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल नक्की दाबा . Place : Swapnapurti Market, Manori, Mumbai, Maharashtra 400092 | Manori Fish Market, Malad, Mumbai Google Direction : https://goo.gl/maps/NQvg1KQBKpmF7px67 Time : 5 pm to 6.30 pm in the evening. #ManoriFishMarket #FishMarketinMumbai #Manori #SwapnapurtiMarket A vegetable and fish market in Gorai's Manori village is a routine in this picnic town which takes place every day between 5 pm to 6.30 pm in the evening.

Tuesday 14 April 2020

राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड ट्रेक | Part 4 | Rajgad - Torna - Lingana - Raigad Trek | गडभ्रमंती



मोहीम - स्वराज्याच्या एका राजधानी पासून स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी पर्येन्त, मुरुंब देवाच्या डोंगरापासून ते रायरीच्या डोंगरापर्येंत, "गडांचा राजा, माझ्या राजियांचा गड" असे संबोदल्या जाणाऱ्या किल्ले राजगडा पासून जिथे बत्तीस मन सोन्याचं राज सिहांसन सजल, जिथे वाऱ्याला ही आत शिरता येत नाही असा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड पर्येंत पूर्ण प्रवास : राजगड ते रायगड गडभ्रमंती प्रवास #R2RTrek #Rajgad #Raigad #Forts #Kille #Rajdhani2Rajdhani

राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड ट्रेक | Part 3 | Rajgad - Torna - Lingana - Raigad Trek | गडभ्रमंती



मोहीम - स्वराज्याच्या एका राजधानी पासून स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी पर्येन्त, मुरुंब देवाच्या डोंगरापासून ते रायरीच्या डोंगरापर्येंत, "गडांचा राजा, माझ्या राजियांचा गड" असे संबोदल्या जाणाऱ्या किल्ले राजगडा पासून जिथे बत्तीस मन सोन्याचं राज सिहांसन सजल, जिथे वाऱ्याला ही आत शिरता येत नाही असा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड पर्येंत पूर्ण प्रवास : राजगड ते रायगड गडभ्रमंती प्रवास #R2RTrek #Rajgad #Raigad #Forts #Kille #Rajdhani2Rajdhani या Video मध्ये मोहरी गावातून बोराट्याची नाळ मार्गे लिंगाणा Base पर्यंतचा पूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे 🙏