प्रचितगड संवर्धन ट्रेक पूर्ण करून थेट गावी - घरच्या आठवणीत | Konkan Village House | Kokankar Avinash गेले दोन दिवस प्रचितगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम क्रमांक ५ द्वारे काम सुरु होते. आज दुपारी जेवण आवरून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. गडावरून उतरताना थरारक पण तेवढाच खास असा अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो. नदीमध्ये सर्वाना निरोप देऊन आम्ही पुढे निघालो आमच्या गावी. निखिल बरेच दिवसांनी आलेला तर गावी घेऊन आलो. निखिलचा पहिलाच ट्रेक म्हणून खूप दमला होता. घर आलो, आईला भेटलो. फ्रेश होऊन आईच्या हातचा कोरा चहा प्यायल्यावर एकदम झक्कास वाटले. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. #Prachitgad #PrachitgadTrek #VillageHouse #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 28 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
No comments:
Post a Comment