आज खेकड्याची शिकार, चुलीवरची खास खेकडा मसाला कालवण रेसिपी! Crab Catching and Chulha Recipe, Konkan नमस्कार मित्रांनो! 🙏 आज आम्ही कोकणातील नदीमध्ये जाऊन केली आहे खेकड्यांची थरारक शिकार! पारंपारीक टोके लावून खेकडे पकडले 🦀 खेकडे पकडण्याचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला खूप मजा आली. आईने खेकडे साफ करून छान खेकडा मसाला आणि खेकडा कालवण बनवले. आजचे जेवण आईच्या हातचे आणि चुलीवरचे आहे त्यामुळे अजून धम्माल आली🔥 या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल: खेकडे पकडण्याची पारंपरिक पद्धत (Crab Catching Vlogs) अस्सल गावरान पद्धतीचं, चुलीवर बनवलेलं झणझणीत खेकडा मसाला कालवण (Khekada Masala Kalvan) कोकणातील निसर्गरम्य दृश्य आणि जेवणाची मजा! व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला खेकडा कालवण (Crab Curry) आवडते की नाही! व्हिडिओ आवडला असल्यास... लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओंसाठी आपल्या 'कोकणकर अविनाश' चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 💪 #KhekadaMasala #CrabCatching #ChulhaRecipe #GavranRecipe #KokaniKhekada #CrabCurry #कोकणीरेसिपी #गावरानजेवण #खेकडाशिकार #KonkanFood #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 27 & 28 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
No comments:
Post a Comment