Saturday, 24 January 2026
Chicken Popati नवीन वर्षाची सुरुवात, थंडीत गरमागरम पोपटी पार्टी😋गावची खास Village Style Winter Party
Chicken Popati नवीन वर्षाची सुरुवात, थंडीत गरमागरम पोपटी पार्टी😋गावची खास Village Style Winter Party नवीन वर्षाची सुरुवात जर चुलीवरच्या गरमागरम आणि झणझणीत 'चिकन पोपटी' ने झाली तर! 🥳🔥 हे वर्ष खास बनवण्यासाठी आम्ही कोकणातल्या कडाक्याच्या थंडीत, आमच्या गावी, मित्रांसोबत हा 'पोपटी पार्टीचा' धम्माल बेत केला आहे. Chicken Popati ही कोकणची एक पारंपारिक आणि खास 'Village Style' डिश आहे, जी एका मातीच्या मडक्यात (Popat) भरून, विशिष्ट पद्धतीने वाफवून किंवा भाजून बनवतात. चिकनला खास गावरान मसाला लावून, थंडीत शेकोटीच्या जवळ बसून पोपटी खाण्याची मजा काही औरच असते! 😋 मी प्रमोद आणि निखिल मिळून पोपटीची तैयारी केली. पहिले तर भामुरडीचा पाला जमा केला त्यांनतर चिकनला मसाले लावले. अर्ध्या तासाने चिकन पोपटी ची तैयारी चालू केली. चिकन, अंडी, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा अशे थरावर ठार केले, त्यात खास गावाकडचे जाडे मीठ वापरले. अर्धा तास आगीवर तर अर्धा तास नॉर्मल निखाऱ्यावर मडकं ठेवले. छान पोपटी तैयार झाली. सर्वानी अक्षरशः ताव मारला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 'पोपटी' बनवण्याची संपूर्ण गावरान पद्धत पाहायला मिळेल, तसेच नवीन वर्षाच्या या 'Winter Party' ची पूर्ण मजा अनुभवायला मिळेल. गावच्या घरी, चुलीवरचं जेवण आणि मित्रांची साथ... व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! व्हिडिओ आवडल्यास: 👍 लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा! 💬 कमेंटमध्ये 'जय कोकण' नक्की लिहा! 🔔 आपल्या 'Kokankar Avinash' चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका! #ChickenPopati #PopatiParty #NewYearSpecial #VillageFood #KonkaniRecipe #GavranChicken #VillageStyleWinterParty #WinterSpecial #ChulivarchaJevan #IndianFood #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 29 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment